गुढी पाडवा साजरा करताय मग हे नक्की वाचा. घरात होईल पैशाची भरभराट. लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल.

1. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.

2. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांकाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.

3. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते

गुढी का उभारतात?

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली हाच तो पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्य युगाची सुरुवात झाली रामाने 14 वर्ष वनवास भोगून लंका अधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला होता.

गुढी दारात उभा केल्याने सर्व नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करण्यासाठी याच दिवशी मुख्य दरवाजावर गुढी उभारा.

गुढी वरील तांब्याच्या कलशाचे महत्व

गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलश्याची ब्रह्मांडातील उच्च तत्वाशी संबंधित सात्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या पानातील रंगकण कार्यरत होण्यास मदत होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्ती लहरींचे वायुमंडळात प्रभावी प्रक्षेपण चालू होते

गुढीपाडवा पूजा विधि

गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी बांबू स्वच्छ धुऊन तेल लावावे. पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उठणं लावून अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. दाराला फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभारण्याचा विधी सुरू करावा. बांबूच्या टोकाला वस्त्र बांधून घ्यावं कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावे. बाजूला कडुलिंबाची डहाळे, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधावी.

तांब्याचा कलश त्या बांबूच्या टोकावर उपडा ठेवावा. त्यानंतर दाराबाहेर दिसेल अशा स्थितीत गुढी पाटावर उभारावी, पाटावर रांगोळी काढावी. आराध्य दैवत गणपतीचे आव्हान करून गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करून पूजेस सुरुवात करावी.

काठीला गंध, फुलं, अक्षता व्हाव्यात. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी. पुरणपोळी, श्रीखंड, दूध, साखरेचा नैवेद्य दाखवावा.

संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरण्यापूर्वी हळद कुंकू, फुले वाहून आणि अक्षता टाकून पूजा करावी. निर्माल्य वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्य कलशात सोडून द्यावे.

गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त

गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी असून गोडी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 29 मिनिट ते सकाळी 7 वाजून 39 मिनिट असा आहे.

सूर्यास्ताची वेळ 6 वाजून 49 मिनिटाची आहे सूर्यास्तपूर्वी म्हणजेच दहा ते वीस मिनिटे आधी गुढी उतरावी

Published by marathipride.com

I am Blogger who wants spred positivity through my words

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started