रामनवमी – या मुहूर्तावर पूजा करा आपल्या मनोकामना पूर्ण होतील

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशीच दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर ( दुपारी बारा वाजता) राम जन्माचा सोहळा होतो.

रामनवमी हा हिंदू चा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

यंदा रामनवमी 30 मार्चला आहे. हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचा मुलाच्या स्वरूपात भगवान विष्णूचा अवतार म्हणून रामाचा जन्मदिन साजरा केला जातो.

रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. दुपारी 12 वाजून 30 मिनिट ते 1:30 पर्यंत मुहूर्त असेल. ज्यामध्ये पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतील.

यावेळी रामनवमी गुरुवारी 30 मार्च रोजी पाच शुभ योगांमध्ये साजरी होणारी आहे. यावेळी रामनवमीला गुरुपुष्य योग, अमृत सिध्दी योग, रवियोग, सर्वार्थसिद्धी योग आणि गुरू योग यांचा संयोग साधला जात आहे. रामनवमीच्या दिवशी या पाच योगांच्या उपस्थितीने श्रीरामाची पूजा फलदायी ठरेल. या दिवशी कामात यश मिळेल.

गुरुपुष्ययोग आणि अमृतसिद्धी योग 30 मार्च रोजी सकाळी दहा वाजून ५९ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि 31 मार्च सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत राहील.

गुरु योग सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहील. रामनवमीच्या दिवशी या पाच योगांच्या संयोगात श्रीरामाची या आराधना केल्याने संकटापासून मुक्ती मिळून संतती सुख प्राप्त होऊ शकते.

श्रीराम नवमी पूजा विधि

प्रभू श्रीरामाचे प्रतिमा किंवा श्रीरामाची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी, श्रीराम पूजनाचा संकल्प करावा, श्रीरामाचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा, यानंतर मुख्य अभिषेक करावा, अभिषेकानंतर हळद-कुंकू, चंदन, फुले, अर्पण करावेत, यानंतर धूप-दीप नैवेद्य दाखवावा आरती करावी.

मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. पूजा झाल्यानंतर राम रक्षा आणि शक्य असल्यास रामायणाचे पारायण करावे. व्रताचा संकल्प केलेल्यांनी दिवसभर केवळ फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी.

श्रीरामाचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते. देवाचा अवतार असले तरी त्यांचे आयुष्य परिश्रमयुक्त असेच होते, मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामांनी भोगले.

राजा दशरथाचे पुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही. रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामाचा जन्म झाला असे सांगण्यात येते. रामनवमीचा दिवस भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा दिवस भगवान रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीरामाची पूजा केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात.

Published by marathipride.com

I am Blogger who wants spred positivity through my words

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started