पुष्पा 2 चा खतरनाक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला. साडी आणि दागिन्यांमध्ये दिसला अभिनेता!


पुष्पा 2 चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आले आहे पोस्टर मध्ये अल्लू अर्जुन चा हा लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत,कारण तो या पोस्टरमध्ये साडीमध्ये दिसत आहे.

ट्रेलर संबंधी विशेष गोष्टी

1  पुष्पा 2 चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आले आहे.
2  पुष्पा 2 चे  पोस्टर चाहत्यांमध्ये  चर्चेत आहे.
3  सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

साउथ सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुन चा चित्रपट पुष्पा 2 च्या पोस्टर सोबतच ट्रेलर ही रिलीज करण्यात आला आहे.ट्रेलर समोर येताच इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे, कारण तो जोरदार आणि धमाकेदार दिसत आहे. ट्रेलर आणि पोस्टरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.अल्लू अर्जुन चा पूर्णपणे नवीन लुक या पोस्टरमध्ये दिसत आहे. अल्लू अर्जुन ला या नवीन लुक मध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. पोस्टरला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

आम्ही तुम्हाला पुष्पा 2 चा ट्रेलर आणि त्याच्या रिलीज बद्दल नवनवीन अपडेट सांगणार आहोत. पुष्पा 2 चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आले असून त्यामध्ये अल्लू अर्जुन चा हा लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत कारण तो या पोस्टर मध्ये साडीत दिसत आहे त्याच्या गळ्यात फुलांचा जड हार आणि लिंबासारख्या फळांचा हारही आहे कपाळावर गोलाकार आणि चंद्राकृती टिकली दिसत आहे आणि गळ्यात जड दागिनेही आहेत. चाहते अल्लू अर्जुन च्या या लुक ची देवीच्या रूपाशी तुलना करत आहेत. पोस्टर रिलीज च्या प्रसंगी अल्लू अर्जुन ने tweet करत लिहिले आहे. “Pushpa 2 The Rule Begins” तुम्ही हे धमाकेदार पोस्टर देखील पाहू शकता.


पुष्पा 2 या पोस्टर ने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून सोशल मीडियावर युजर्स त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.अल्लू अर्जुन ने त्याच्या ट्विटर  वरून शेअर केलेल्या पोस्टवर युजरने तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासोबतच युजर्स ने त्यांच्या या लुक चा अर्थ काय आहे हे देखील सांगितले आहे.  एका युजरने टिप्पणी केली की तिरुपती (जिथे चित्रपटाची कथा आधारित आहे )येथे गंगामा तल्ली जटारासाठी विविध घटक घालण्याची परंपरा आहे जिथे लोक त्यांचे विधी पूर्ण करण्यासाठी मंदिरात जातात.

सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत चित्रपटाचे लेखन ही त्यांनी केले आहे या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर ही निर्मात्यांनी लॉन्च केला आहे.आतापर्यंत 2.2 कोटी लोकांनी तो पाहिला आहे आणि 12 लाखाहून अधिक लोकांनी like केले आहे.

पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदांना देखील पूर्वीप्रमाणेच मुख्य भूमिकेत दिसेल फहाद फाझिल आणि अनुसया भारद्वाज देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पुष्पा 2 त्याच्या पहिल्या भागापेक्षा मोठ्या प्रमाणावर बनवला जात आहे .

“Pushpa The Rise 2021” मध्ये रिलीज झाला होता आणि त्याच्या रिलीज ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 350 कोटीहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने एकट्या हिंदी पट्ट्यात शंभर कोटीहून अधिक कमाई केली होती.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर पाहू शकता.

Published by marathipride.com

I am Blogger who wants spred positivity through my words

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started