1 एप्रिलपासून UPI पेमेंट महागणार? पण जाणून घ्या काय आहे नेमकं सत्य.

UPI Payment Charges : मंगळवारच्या एका अहवालात सांगण्यात आले होते की, १ एप्रिलपासून UPI व्यवहार महाग होणार आहेत. यामध्ये NPCI च्या परिपत्रकाचा हवालानुसार UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर १.१% प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI लादण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महागाईचा आणखी एक झटका एप्रिल महिन्यात देखील बसणार आहे. यूपीआय (UPI) द्वारे पैसे भरणे आता येत्या काही दिवसात महागणार असून UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी १ एप्रिलपासून तुम्हाला शुल्क भरावे लागेल.


NPCI परिपत्रकानुसार ऑनलाइन व्यापारी, मोठे व्यापारी आणि लहान ऑफलाइन व्यापाऱ्यांनी केलेल्या दोन हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी वापरकर्त्यांना १.१ टक्के इंटरचेंज फी भरावी लागेल.

अहवालामुळे उडाला गोंधळ

NPCI नुसार UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यापारी व्यवहारांवर १.१ टक्के प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क आकारले जाईल, ही बातमी आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. प्रश्न असा आहे की, या निर्णयानंतर यूपीआय वापरकर्त्यांसाठी महाग होईल का? हा शुल्क सर्व प्रकारच्या ऑनलाइन पेमेंटवर लादला जाणार आहे की कोणत्याही विशिष्ट विभागावर त्याचा परिणाम होणार आहे? असाही संभ्रम निर्माण झाला.

NPCI ने स्पष्टीकरण देत काय म्हटले?

अशा स्थितीत सामान्य नागरिकांचा गोंधळ दूर करत NPCI ने स्पष्टीकरण जारी केले आणि म्हटले की व्यापारी UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल. म्हणजेच, बँका आणि प्रीपेड वॉलेटमधील पीअर-टू-पीअर (P2P) आणि पीअर-टू-मर्चंट (P2M) व्यवहारांवर शुल्क लागू होणार नाही. एकूणच सामान्य नागरिकांना टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि तुम्ही कोणत्याही त्रास आणि काळजीशिवाय UPI पेमेंट करू शकता. तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्यासाठी UPI पेमेंट पूर्णपणे मोफत असून तुमच्यासाठी काहीही बदलल झालेला नाही. UPI बँक हस्तांतरणामध्ये काहीही बदल झालेला नाही.

नवीन नियम फक्त Wallets/PPI साठी आहे. म्हणजे तुम्ही वॉलेटमधून दोन हजारांपेक्षा जास्त व्यवहार केले तर तुम्हाला इंटरचेंज फी भरावी लागू शकते. म्हणजेच तुम्ही वॉलेट, क्रेडिट कार्ड यांसारख्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) द्वारे UPI पेमेंट केले तर तुम्हाला इंटरचेंज फी भरावी लागेल. हे शुल्क तुम्ही व्यापाऱ्याला केलेल्या एकूण पेमेंटच्या १.१% असेल.

NPCI ने आपल्या परिपत्रकात म्हटले की बँक खाती आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPIs) दरम्यान पीअर-टू-पीअर आणि पीअर-टू-पीअर-व्यापारी व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परिपत्रकात, P2P, P2M व्यवहारांवर याची अंमलबजावणी करू नका, असे म्हटले आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा दुकानदाराला पैसे दिले आणि पेमेंट पर्याय म्हणून बँक खाते निवडले, तर तुम्हाला शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजेच, कोणत्याही प्रकारचे शुल्क टाळण्यासाठी UPI पेमेंट करताना बँक खात्याचा पर्याय निवडणे चांगले.

मुंबई पुणे महामार्गवरील टोल दरात होणार वाढ

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरात 18 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी 1 एप्रिल पासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला 50 ते 330 पर्यंत ची अधिक झळ सोसावी लागणार आहे.

मुंबई पुणे महामार्गावरील 2004 साली टोल आकारणी सुरू करताना दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्क्यांनी दर वाढ करण्याचा निर्णय झाला होता.

त्यानुसार एप्रिल 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. १ एप्रिल 2023 रोजी लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम राहतील असे एम.एस.आर.डी.सी कडून सांगण्यात आले आहे.

नवीन टोल दर पुढील प्रमाणे –

वाहतूक व्यवस्थापनाची यंत्रणा नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात टोल दर वाढीवरून नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

कोरोना व इतर आर्थिक संकटातून माल, प्रवासीवाहतूकदार सावरत असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केलेली टोल दरवाढ अन्यायकारक आहे या दरवाढीचा विचार व्हावा असे आवाहन करणारे पत्र महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहेत

रामनवमी – या मुहूर्तावर पूजा करा आपल्या मनोकामना पूर्ण होतील

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशीच दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर ( दुपारी बारा वाजता) राम जन्माचा सोहळा होतो.

रामनवमी हा हिंदू चा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

यंदा रामनवमी 30 मार्चला आहे. हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचा मुलाच्या स्वरूपात भगवान विष्णूचा अवतार म्हणून रामाचा जन्मदिन साजरा केला जातो.

रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. दुपारी 12 वाजून 30 मिनिट ते 1:30 पर्यंत मुहूर्त असेल. ज्यामध्ये पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतील.

यावेळी रामनवमी गुरुवारी 30 मार्च रोजी पाच शुभ योगांमध्ये साजरी होणारी आहे. यावेळी रामनवमीला गुरुपुष्य योग, अमृत सिध्दी योग, रवियोग, सर्वार्थसिद्धी योग आणि गुरू योग यांचा संयोग साधला जात आहे. रामनवमीच्या दिवशी या पाच योगांच्या उपस्थितीने श्रीरामाची पूजा फलदायी ठरेल. या दिवशी कामात यश मिळेल.

गुरुपुष्ययोग आणि अमृतसिद्धी योग 30 मार्च रोजी सकाळी दहा वाजून ५९ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि 31 मार्च सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत राहील.

गुरु योग सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहील. रामनवमीच्या दिवशी या पाच योगांच्या संयोगात श्रीरामाची या आराधना केल्याने संकटापासून मुक्ती मिळून संतती सुख प्राप्त होऊ शकते.

श्रीराम नवमी पूजा विधि

प्रभू श्रीरामाचे प्रतिमा किंवा श्रीरामाची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी, श्रीराम पूजनाचा संकल्प करावा, श्रीरामाचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा, यानंतर मुख्य अभिषेक करावा, अभिषेकानंतर हळद-कुंकू, चंदन, फुले, अर्पण करावेत, यानंतर धूप-दीप नैवेद्य दाखवावा आरती करावी.

मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. पूजा झाल्यानंतर राम रक्षा आणि शक्य असल्यास रामायणाचे पारायण करावे. व्रताचा संकल्प केलेल्यांनी दिवसभर केवळ फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी.

श्रीरामाचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते. देवाचा अवतार असले तरी त्यांचे आयुष्य परिश्रमयुक्त असेच होते, मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामांनी भोगले.

राजा दशरथाचे पुत्र असूनही वनवास त्यांना चुकला नाही. रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामाचा जन्म झाला असे सांगण्यात येते. रामनवमीचा दिवस भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा दिवस भगवान रामाची जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीरामाची पूजा केल्याने त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात.

राज्य उत्पादक शुल्क विभागात प्रथमच मोठी भरती

महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्य महसुली उत्पन्न मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे.

कोरोना काळात विभागाच्या उत्पन्नाची नोंद काही प्रमाणात कमी झाली होती परंतु गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्न वाढ चांगली झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या पाच महिन्यात वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची मोठी भरती केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

राज्य उत्पादक शुल्क विभागात प्रथम इतकी मोठी पदभरती केली जात आहे.

टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी 290 पदांच्या भरतीची मागणी केली आहे.

त्यापैकी 114 पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे

उरलेली 176 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरली जाणार आहेत

याशिवाय पुढील काळात या विभागाचे उत्पन्न वाढेल आणि रिक्त पदे भरली जातील त्या दृष्टीने प्रयत्न करू असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांच्या खात्यात आता व्याज जमा होणार

ही सवलत योजना दिनांक 1 एप्रिल 1990 पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे.

राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, खाजगी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थेमार्फत व बँकामार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याज दराशी निगडित व्याज सवलत देण्यात येत आहे.

शासनाने 11 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये तीन लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने 3 टक्के व्याज सवलत विचारात घेऊन, सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे.

मात्र थकीत कर्जास तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही.

शासन निर्णय –

वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँका/ संस्था वितरित करताना आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रक्कमे बाबत उपयोगिता प्रमाणबद्ध पत्र प्राप्त करून घ्यावे व त्याची प्रत शासन सादर करावे लागेल.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

शासन निर्णय – पाहण्यासाठी इथे क्लिक करा

थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहात?

थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथी आहेत. त्याच्या संतुलनाच्या अभावाने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथी गळ्याच्या खालच्या भागात तयार होतात. या ग्रंथी शरीरात हार्मोन्स निर्माण करायला फार उपयुक्त असतात. या हार्मोन्स ग्रंथी शरीरातील मेटाबोलिजिम तयार करायला कारणीभूत असतात.

थायरॉईडचे दोन प्रकार आहेत

1. हायपर थायरॉईड – थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात ग्रंथी निर्माण करू लागल्या तर त्याला हायपर थायरॉईड असे म्हणतात.

2. हायपो थायरॉईड – थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात ग्रंथी निर्माण करू लागल्या तर त्याला हायपो थायरॉईड म्हणतात

ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते

थायरॉईड होण्याची प्रमुख कारणे

1. तणावग्रस्त राहणं हे या समस्यांमधील एक प्रमुख लक्षण मानले जाते.

2. थायरॉईड होण्याचे मुख्य कारण आयोडीनची कमतरता हे असलं तरी ते अनुवंशिक ही असू शकतं

3. सोया उत्पादने जास्त सेवन केल्यामुळे देखील थायरॉइडचा त्रास होऊ शकतो.

4. पिट्यूटरी ग्रंथी वाढल्याने सुध्दा थायरॉईड होऊ शकतो

5. मानसिक ताण असणं हे देखील थायरॉईड निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे.

थायरॉईड ची लक्षणे

1. नेहमीपेक्षा अचानक वजन जास्त वाढणे किंवा कमी होणे
2. वारंवार थकवा जाणवणे हे एक प्रमुख लक्षण महिलांमध्ये जाणवतात.
3. थायरॉईड अंडर ऍक्टिव्ह होतो तेव्हा थकवा येणं आणि खूप झोप येणे यासारखे लक्षणे दिसून येतात.
4. नखे आणि केस पातळ होणे किंवा केस गळणे हेही थायरॉईड असल्याचं सगळ्यात आधी दिसून येणार लक्षण आहे.
5. अनियमित मासिक पाळी, डिप्रेशन मध्ये जाणे या लक्षणांवरून थायरॉईड असल्याचे दिसून येते

थायरॉईड ची वरील लक्षणे ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात.
रक्त तपासणी मध्ये T3 आणि T4 यांच्या प्रमाणावरून थायरॉईडचे प्रमाण कळते.
(TSH – Thyroid Stimulating Harmone) याच्या प्रमाणावरून थायरॉईड ग्रंथीची पातळी कमी किंवा जास्त आहे याची कल्पना येते.
थायरॉईड हा औषधाबरोबर व्यायाम आणि पौष्टिक आहार, योगासने यामुळे नियंत्रणात ठेवता येतो. तणाव मुक्त राहणे, योग क्षेत्रातील कपालभाती केल्याने थायरॉईड पासून मुक्तता होत असल्याचे दिसून आले आहे.

वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास जरूर एकदा आपल्या डॉक्टरांशी जरूर सल्ला मतलब करा.

“लेक लाडकी योजना” आता मुलींना मिळणारप्रत्येकी ” 75 हजार रूपये”

लेक लाडकी या योजनेअंतर्गत मुलींना 75 हजार रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत.

पहा मित्रांनो मुलींच्या सक्षमी करणासाठी योजना आता नव्या स्वरूपात आणली आहे यामध्ये

√ मुलींचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीला पाच हजार रुपये मिळणार
√ पहिलीत असताना चार हजार
√ सहावीत असताना सहा हजार
√ अकरावीत गेल्यानंतर आठ हजार मिळणार
√ ती मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये राज्य शासनाकडून मिळणार. तर अशा प्रकारे ही रक्कम मुलींना तिच्या वाढत्या वयानुसार मिळणार आहे.

या लेक लाडकी योजनेसाठी कोणत्या मुली पात्र असणार आहेत.

√लाभार्थी मुलगी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी.
√ या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलीच्या कुटुंबातील रेशनकार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचा असावा.
√ फक्त दुर्बल वंचित घटकातील लाभार्थी मुलींनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
√ 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शासनाकडील 75 हजार रुपये मिळवायचे असल्यास, सर्व शैक्षणिक कागदपत्रं असणे अनिवार्य आहे.

लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची माहिती दिली; परंतु अद्याप या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिकृत पोर्टल अथवा वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा ऑफलाईन अर्जाची पद्धत सुरू झाल्यानंतर आमच्या वेबसाईटवरती याची माहिती देण्यात येईल.

स्वामी समर्थ प्रकट दिन – हे वाचा श्री स्वामी समर्थांची प्रचिती नक्की येईल

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यदांच्या वर्षी म्हणजेच 2023. मध्ये हा तिथी गुरूवार 23 मार्च रोजी आहे.
“श्री स्वामी समर्थ”हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रम्हस्वरूप तिसरा अवतार आहेत.भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठुमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात.तर कुणाला भगवती देवीच्या रुपात.

चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्लकोट येथे दाखल झाले, श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती याच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णवतार अवतार आहेत ,अशी मान्यता आहे.

स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले.
अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांना प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन, असल्याची माहीतीही त्यांनी स्वत: चं सांगितली आहे. शिष्य श्री बाळाप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नांवानी प्रसिद्ध होते.

स्वामी त्यांच्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत भक्तांच्या समस्या महाराजांना न सांगता समजतात, म्हणूनच आयुष्यात जे काय घडते ते आपल्यासाठी च योग्य असते असे मानून जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक हवा,

अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींचे बोधवाक्य लक्षात ठेवून आपण नेहमी सत्कर्म करत रहावे. त्यामुळे स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात व आपण सेवेत रमून जातो त्यामुळे अहंकार, लोभ, वाद विवाद, स्वार्थीपणा आपल्या आयुष्यात येत नाही.

स्वामींचा सेवेकरी हा निर्मळ, स्वच्छ मनाचा, नेहमी पारदर्शी व्यवहार करणारा, कितीही मोठा असेल तरी अहंकार न बाळगणारा असा असतो. जीवन सुरळीत चालण्यासाठी आपल्या हातून चुका कमी होऊन जास्तीत जास्त चांगले जगता यावे

कुटुंबाच्या समृद्धीसाठी दर शनिवारी कणकेच्या तेलाचा दिवा लावून श्री हनुमंताचा मंदिरांमध्ये लावून हनुमान च्या पुढे मनोभावे राम रक्षा बोलावी. हा प्रभावी उपाय आहे. यामुळे आपल्या कुटुंबातील समृद्धी वाढते. जगण्यासाठी मदत होते. प्रगती मध्ये वाढ होते. त्यानंतर आपण आपल्या ज्ञानाचे दान केले पाहिजे.

एखाद्या गोष्टीच जर आपल्याकडे भरपूर ज्ञान असेल तर ते नेहमी सोबत शेअर केले पाहिजे कारण कळत नकळत आपल्या मुळे लोकांचे देखील चांगले होते त्यामुळे आपल्या मध्ये असं काही स्पिरिट्स असते तर ते नेहमी लोकांसोबत तुम्ही शेअर करा त्यामुळे नक्कीच फायदा होईल.

चांगल्या कर्माचे फळ चांगल्या तऱ्हेने आपल्यालाच मिळणार आहे. लक्षात ठेवा सरळ मनाचा माणूस असतो तोच माणूस आपल्या स्वामीना प्रिय असतो. समोरचा व्यक्ती किती पण चांगला असु द्यात की वाईट आपण नेहमी चांगले वागण्याचा गुण ठेवले तर त्यामुळे स्वामींची नेहमी कृपा आपल्यावर राहील.

|| श्री स्वामी समर्थ ॥

गुढी पाडवा साजरा करताय मग हे नक्की वाचा. घरात होईल पैशाची भरभराट. लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल.

1. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.

2. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांकाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.

3. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते

गुढी का उभारतात?

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली हाच तो पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्य युगाची सुरुवात झाली रामाने 14 वर्ष वनवास भोगून लंका अधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला होता.

गुढी दारात उभा केल्याने सर्व नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करण्यासाठी याच दिवशी मुख्य दरवाजावर गुढी उभारा.

गुढी वरील तांब्याच्या कलशाचे महत्व

गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलश्याची ब्रह्मांडातील उच्च तत्वाशी संबंधित सात्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या पानातील रंगकण कार्यरत होण्यास मदत होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्ती लहरींचे वायुमंडळात प्रभावी प्रक्षेपण चालू होते

गुढीपाडवा पूजा विधि

गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी बांबू स्वच्छ धुऊन तेल लावावे. पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उठणं लावून अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. दाराला फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभारण्याचा विधी सुरू करावा. बांबूच्या टोकाला वस्त्र बांधून घ्यावं कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावे. बाजूला कडुलिंबाची डहाळे, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधावी.

तांब्याचा कलश त्या बांबूच्या टोकावर उपडा ठेवावा. त्यानंतर दाराबाहेर दिसेल अशा स्थितीत गुढी पाटावर उभारावी, पाटावर रांगोळी काढावी. आराध्य दैवत गणपतीचे आव्हान करून गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करून पूजेस सुरुवात करावी.

काठीला गंध, फुलं, अक्षता व्हाव्यात. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी. पुरणपोळी, श्रीखंड, दूध, साखरेचा नैवेद्य दाखवावा.

संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरण्यापूर्वी हळद कुंकू, फुले वाहून आणि अक्षता टाकून पूजा करावी. निर्माल्य वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्य कलशात सोडून द्यावे.

गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त

गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी असून गोडी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 29 मिनिट ते सकाळी 7 वाजून 39 मिनिट असा आहे.

सूर्यास्ताची वेळ 6 वाजून 49 मिनिटाची आहे सूर्यास्तपूर्वी म्हणजेच दहा ते वीस मिनिटे आधी गुढी उतरावी

Design a site like this with WordPress.com
Get started